अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
राजगुरुनगर येथील विमुक्त भटक्या जातीतील गोसावी समाजातील दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व भटका समाज एकत्रित होऊन लढा दिला. त्यावेळी खेडचे आमदार श्री. बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप शेठ मोहिते, श्री.अतुल देशमुख, सौ विजयाताई शिंदे, विजय डोळस, किरण आहेर, अजय चव्हाण असे अनेक राजगुरुनगर मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व पुढाकाराने लढा यशस्वी झाला.
यावेळी विधानसभा सभापती नीलम ताई गोरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मा. रुपालीताई चाकणकर यांनी पीडित कुटुंबाला सांत्वन पर भेट दिली असता सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व पीडित कुटुंबांना शासनातर्फे तर्फे मदत करावी तसेच अशा घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी काही उपाययोजना सुचविल्या.
त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी भेट दिली त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहेब हस्ते त्यांनी सदर पीडित कुटुंबीयाला रोख पाच लाख मदत म्हणून दिली. व त्या कुटुंबीयाला योग्य न्याय तसेच त्यांना राहण्यासाठी घरकुल देण्याच्या आश्वासन दिले. कार्यकर्त्यांनी समाजाच्या अनेक मागण्या त्यांच्यापुढे मांडण्यात आले. यावेळी गोसावी समाजाचे राज्य अध्यक्ष श्री संजयजी कदम, वैदू समाजाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष व माजी सरपंच श्री. नारायण शिंदे,जामखेडचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व राज्य कार्यकारणी सदस्य अॅड. डॉ अरुण जाधव, हडपसरचे किशोर शिंदे, उषा वाखारे, श्री अशोक गिरी महाराज साक्री, श्री राजेश गोसावी, उमा जाधव लता सावंत श्री.वज्ररा लोखंडे असे अनेक भटक्या विमुक्त जातीतील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहून सदर पीडित कुटुंबीयाला न्याय मिळवून देण्याचे काम केले. सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद
