अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी (सातारा)
राजगुरुनगर व लोणावळा प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरवठा करणार:- रूपाली चाकणकरांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची घेतली तात्काळ भेट संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. राजगुरुनगर तालुक्यांत दोन सख्या बहिणींना एका परप्रांतीय नराधम व्यक्तीने जिवे मारून टाकल्याच्या घटनेने तालुक्यांत मोठी खळबळ उडाली आहे, या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे, तसेच या प्रकरणात नराधम आरोपींने या बहिणींपैकी एकीवर लैंगिक अत्याचार करून दोन्ही बहिणींची पाण्याच्या बॅलरमध्ये बुडवून हत्या केली होती, या घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यांत उमटल्याचे पाहायला मिळत आहे, या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नागरिक ही रस्त्यावर उतरले आहेत, आता या प्रकरणावर राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, या प्रकरणी रूपाली चाकणकरांनी तात्काळ पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली असून, आरोपीला फाशीची शिक्षेसाठी पाठपुरवठा करणार असल्यांचे आश्वासन माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत दिले आहे, राजगुरुनगर व लोणावळा येथील घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत, ओळखीचा फायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलींची हत्या केली असल्याचे रूपाली चाकणकरांनी सांगितले आहे, तसेच पोलिसांनी या प्रकरणी ॲक्शन मोडवर येवुन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करून आरोपीला ताब्यांत घेवुन त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचेही आश्वासन यावेळी बोलताना रूपाली चाकणकरांनी केले आहे.
