एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

रिक्षा चोरी करून त्यातुन घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडून अटक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाची कैाशल्यूपर्ण कामगिरी.

कात्रज-कोंढवा रोडवरील विश्वजीम जवळ, कनेक्टीफाय इन्फोटेक नावाचे रिअल इस्टेटचे ऑफीस अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह, सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट व इतर इलेक्ट्रानिक साहीत्य असे मिळून एकुण १,४३,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल चोरी केले बाबत फिर्यादी अक्षय श्रवण सातपुते, वय २४ वर्षे, रा. कात्रज-कोंढवा रोड, पुणे यांचे फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाणेस घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हा उघडकीस आनणेबाबत मा. मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

तपास पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर यांना सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे पहाणी करीत असताना सदरचा गुन्हा हा अभिलेखावरील आरोपी नामे १) कृष्णा कुमार देवेंद्र, वय २० वर्षे, रा. चाळ नंबर ९८/२, पंचशील चौक, पर्वती दर्शन, पुणे २), अथर्व प्रदीप शेंडगे, वय १९ वर्षे, रा. चाळ नंबर १००, घर नंबर ४, म्हसोबा मंदीराशेजारी, पर्वती दर्शन, पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपींचा शोध घेत असता ते लेकटाऊन सोसायटी परिसरामध्ये असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत नमुद अंमलदारांना माहीती मिळाल्याने नमुद आरोपींना सापळा लावून शिताफिने पकडले असता त्यांचे ताब्यात रिक्षा मिळुन आली सदर रिक्षाबाबत तपास करता सदरची रिक्षा चोरीस गेल्या बाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळाली, तरी नमुद आरोपींना अटक करून त्यांचेकडून रू१५०,०००/- जु.या. किंमतीची रिक्षा रजि.नं. एम.एच.१२ एस. के. ०४३७ ही जप्त करण्यात आली आहे. तसेब खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

१) भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं १०८०/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४),३०५ २) भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं १०८१/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमाले, सागर बोरगे, मंगेश पवार, चेतन गोरे, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

(डी.एस.पाटील) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link