पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
पुणे , मोशी : 05 जानेवारी 2025 रोजी मोशी येथे “इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रथमच मोशी च्या “भूमि कन्या, ला हा मान मिळणे हे मोशी करांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
सकल हिंदू समाज यांच्या वतीने महाआरतीच्या आयोजनात सौ. वंदनाताई हिरामण आल्हाट यांना आमंत्रित करण्यात आले होते सकल हिंदू समाज मोशी यांच्या वतीने (पत्रकार) राष्ट्रीय धर्म हिंदू संघटन संघटन मंत्री, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हंसराज पाटील, श्री प्रसादजी हांडे यांच्या हस्ते सौ वंदना ताई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ वंदनाताई यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधव, युवा वर्गां समोर आपले मनोगत व्यक्त केले,सामाजिक,सांस्कृतिक धार्मिक, साहित्यिक कार्याची आवड लहानपणा पासुन जोपासणे, व ते आचरणात आणणे व त्याच्या वापर समाजासाठी कसा करता येईल हे पाहणे महत्वाचे आहे , समाजात चांगल्या कार्याला कधीही स्थान प्राप्त होते या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.
. सौ वंदनाताई हिरामण आल्हाट या मोशी गावच्या कन्या असून त्यांना वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे, ते सामाजिक कार्यात सतत सेवारत असतात.
साहित्य, कला संस्कृतिचे जतन व्हावे तसेच त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. मोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांचा नाव लौकिक आहे.
या कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाज मोशी चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रविण भाऊ गोरे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मोशी करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
