नवीमुंबई | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० पासून सलग दोन दिवस आमारण उपोषण केले आसता. नवीमुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार साहेब यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य करत. संबंधित विभागाला लेखी पत्र देण्याचे व ती कामे नाही केल्यास अथवा कामात कसुर केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले असता अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या विनंतीला मान देत काल रात्री ९.०० च्या सुमारास पालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषण सोडण्यात आले. जर लेखी अश्वासित केलेल्या पत्रांच्या अनुषंगाने मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा ह्यापेक्षा तिव्र आंदोलनाचा इशारा वंचितचे ॲड.उमेश हातेकर यांनी दिला.
मान्य झालेल्या मागण्या व पुर्ण करुन देण्याचा कालावधी पालिकेने पुढीलप्रमाणे दिला आहे.
१) पाळणाघर सुरु करण्याबाबत –
पाळणाघराची सुविधा मोफत देण्यात येणार तसेच येत्या १५ दिवसात व जास्तीत जास्त १ महिन्यात EOI प्रसिद्ध केली जाणार असे समाज विकास विभागाचे उप आयुक्त किसनराव पलांडे याचे लेखी पत्र.
२) उद्यानांची देखभाल, दुरुस्ती धोकादायक झाडांची फांद्यांचीछाटणी करण्याबाबत.
क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानातील प्रवेशद्वार दुरुस्तीच्या कामाला येत्या १५ दिवसात सुरुवात होईल.
धोकादायक झाडांची फांद्यांची छाटणी १ महिन्यात पुर्ण करण्यात येईल असे उद्यान विभागाचे उप आयुक्त दिलीप नेरकर साहेब यांचे लेखी पत्र.
३) सी.बी.एस.ई शाळा क्र ९३ मधील २०२२ सालचे ८६६ पालकांचे पैसे परत करण्याबाबत
येत्या १५ दिवसात पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे शिक्षण विभागाच्या उप आयुक्त संघरत्ना खिल्लारे यांचे लेखी पत्र.
४) मे. विशाल एक्सपर्ट सर्विस प्रा.लि.कंपनी वर कारवाई करण्याबाबत
वंचित बहुजन आघाडीच्या दबावाने मे.विशाल एक्सपर्ट सर्विसेस प्रा.लि.कंपनीने कामगारांचा ESIC ची रक्कम भरली तसेच येत्या १० दिवसात PF जमा करणार आसल्याचे लेखी पत्र दिले. PF जमा नाही केला तर १० दिवसांनी कंत्राट टर्मिनेट करण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आश्वासन दिले. तसेच एवढा दिवस PF व कामगारांचा पगार वेळेवर न दिल्याने अटी शर्तीनुसार दंडात्मक कारवाई! करण्याचे वाहन विभागाचे उप आयुक्त नयना ससाणे यांचे लेखी पत्र.
५) रबाळे येथील आदिवासी पाडा मधील नागरिकांची कायम स्वरुपी पाण्याची सोय करण्याबाबत
आदिवासी पाडा येथील नागरिकांना कायम स्वरुपी पाण्याची करण्याच्या कामाला पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात तसेच येत्या ४ महिन्यात काम पुर्ण करणार असल्याचे व तो पर्यत रोज टँकर ने पाणी पुरवठा करणार असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता ( स्थापत्य ) यांचे लेखी पत्र
६) सार्वजनिक शौचालय कामात भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत
संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई व सीवूड्स विभागातील शौचालयातील अंतर्गत रंग कामाच्या व सेवा पुरविण्याच्या कामास सुरुवात तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर १५ दिवसात कारवाई करण्याचे उप आयुक्त ( परिमंडळ – १ ) सोमनाथ पोटरे यांचे लेखी पत्र
७) करावे गांव व सेक्टर ४८ आरोग्य केंद्रात अर्बन हेल्थ आणि वेलनेस सेंटर सुरु करण्याबाबत
अर्बन हेल्थ आणि वेलनेस सेंटर करावे गाव येथे ४ व सेक्टर ४८ येथे २ असे एकुण ६ वेलनेस सेंटर प्रस्तावित आहेत. ६०० ते ८०० स्के.फुट. जागा मिळाल्यास लवकर सुरु करण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे लेखी पत्र.
यावेळी बापु दडस, सुधाकर पाटील, हरिश्चंद्र पवार, रत्नाकर कुदळे, अरुण यशवंते, ॲड. संदेश मोरे,डॉ. संतोष कुसरे ,राहुल जाधव, राहुल शिरसाठ, हेमंत दिवेकर, अक्षय भंडगे, राजेंद्र बनसोडे, स्वप्निल येवले, दिपक गायकवाड,संजय हेगडे, राजेंद्र गायकवाड, सिद्धार्थ सोलसे , विजय झनके , दिपक कांबळे , संतोष कांबळे , मिलिंद मंडपे, विवेक वरणे, छायाताई दिवे , प्रमिला जाधव , मिथुन कांबळे, धम्मशिलाताई वाढवे, सुर्यकांत अहीरे , चंद्रकांत यशवंते नवी मुंबई जिल्ह्यातुन आलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, संतोष टेकवडे साहेब, मधुकर रगडे साहेब, जिवन वाढते गुरुजी,संजय झनके गुरुजी, सीवूड्स विभागातील महिला, आदिवासी पाड्यातील महिला व त्यांची मुले, रुग्णवाहिका चालक कामगार तसेच शुभचिंतक, मित्र मंडळी ॲड.उमेश हातेकर यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
