पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
आयएएस अधिकारी आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत, संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. आयएएस अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त प्रभारी जिल्हाधिकारी आदरणीय संतोष जी. पाटील साहेबांची जयहिंद साहेब असे म्हणत पुरीगोसावी यांनी मंगळवारी दुपारी सदिंच्छा भेट घेतली, या प्रसंगी पुरीगोसावी यांनी आपला प्रथमच परिचय देवुन त्यांच्या दालनामध्ये स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, आयएएस अधिकारी संतोष पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगांव (ता. बार्शी ) येथील आहेत, कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे, पुणेच्या कृषी महाविद्यालयाचे ते पदवी पदवीधर आहेत,1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी म्हणून निवड केली होती,1996 मध्ये त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी कारकिर्दीस सुरुवात केली होती, उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी,विशेष भूमी संपादक अधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) व प्रादेशिक अधिकारी एम आय डी.सी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे, त्यामध्ये पांढरकवडा,अकोला नांदेड जिल्ह्याचा समावेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून 2016 साली बढती मिळाल्यानंतर त्यांनी 2016 ते 2018 या काळात नांदेड ते अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले, 2018 ते 2020 च्या काळात पिंपरी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता, 2020 मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्यावर विभागीय उपायुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, तेथे त्यांनी 2022 पर्यंत काम पाहिले, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते, त्यानंतर त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती, कोल्हापूर जिल्ह्यातही त्यांचा कार्यकाळ हा उत्कृंष्ट ठरला, त्यानंतर 22 मार्च 2024 मध्ये पुणेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या बदलीनंतर त्यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती, आयएएस अधिकारी संतोष पाटील यांची आजपर्यंत महसूल प्रशासनात विविध जिल्ह्यात तसेच विविध पदावर उत्कृंष्ट सेवा आहे, पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आजपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा उत्कृंष्ट ठरला, या पदावरून आजही अनेक अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
