बीड | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विष्णू चायते यांचे नाव समोर आले असून, अजित पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 9 डिसेंबरला अपहरणानंतर २ कोटींच्या खंडणीसाठी देशमुख यांची निघृण हत्या झाली. प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून खासदार बजरंग सोनवणे यांनी सीबीआय चौकशीसाठी अमित शहा यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी जलदगती न्यायालयात सुनावणीची मागणी करत दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे.
