वाई | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव.
गुन्हे प्रकटीकरण शाखा वाई पोलीस स्टेशनं यांची दमदार कार्यवाही.
वाई : वाई पोलीस ठाणेच्या अंतर्गत व हद्दीमध्ये हरवलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळवण्याची शाश्वंती कमी असताना व मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल याची खात्री नसते, तरीही नागरिक पोलिसांकडे तक्रार दाखल करतात मोबाईल हरवल्यापेक्षा त्यामधील डेटा आणि इतर माहितीमुळे नागरिक चांगलेच हैराण होत असतात. त्याचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असते,वाई पोलिसांनी मोठी कामगिरी करीत नागरिकांचे गहाळ आणि हरवलेले मोबाईल जवळपास 60 मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवले आहे संबंधित नागरिकांना हे मोबाईल श्री. श्याम पानेगावकर. पोलीस उपाअधीक्षक प्रभारी अधिकारी वाईपोलीस ठाणे यांच्या हस्ते केले परत.
वाई हे जिल्ह्यातील मोठी बाजार पेठ असून येथे नोकरदार वर्ग. कामगार वर्ग व आजू – बाजू च्या खेडेगावातून बऱ्याच प्रमाणात लोकं येत असून वाई शहरांत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले असून दररोज मोबाईल चोरीस जात असून हि बाब मा. पोलीस अधीक्षक सातारा ह्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आदेश काढला असता वाई पोलीस स्टेशनंने गहाळ झालेले 60 मोबाईल छडा लावून ते तक्रादार यांना परत केले.
यावेळी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत, अखेर राबोडी पोलिसांनी एकूण 12लाख . किंमतीचे एकुण 69 मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, संबंधित नागरिकांना हे मोबाईल परत करण्यात आल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात आली, सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख.अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. वैशाली कडूकर मॅडम. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली.
श्याम पानेगावकर पोलीस उपाधीक्षक प्रभारी वाई पोलीस ठाणे पथकांने ही कामगिरी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलीस हवालदार अजित जाधव. पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल. राम कोळी मंगेश शिंदे हेमंत जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल Suggestions पोलीस कॉन्स्टेबल महेश ASKS (सायबर) यांच्या पथकाने केली.
