मधुतारा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संजय धर्मे
दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि श्री दत्त रिक्षा संघटना हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर माळवाडी विठ्ठल तुपे नाट्य गृहा शेजारी दत्त मंदिर रिक्षा स्टेन्ड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.
या वेळी रिक्षा संघटनाचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम अती उत्साहात पार पाडला.
मधुतारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांच्या नियोजनखाली H V देसाई हॉस्पिटल नेत्र रुग्णालय यांनी सहकार्य केले.
या वेळी शिबिरास राजकीय.सामाजिक.अध्यातमीक.चित्रपट क्षेत्रातील नामवंत लोकांनी.पुणे महानगर पालिकेच्या सामाजिक विकास विभागाचे पदाधिकारी तसेच हडपसर परिसरातील अनेक कर्तबगार लोकांनी हजेरी लावली.
या वेळेस मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी शिबिरास आलेल्या मान्यवरांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.या वेळी शहर तसेच हडपसर परिसरातील. खेड राजगुरुनगर येथील दिव्यांगानी मोठ्या प्रमाणावर शिबिरात सहभाग घेतला.
या वेळी असंख्य नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आली व अनेक लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नावे रजिस्ट्रेशन. करण्यात आली.
