मुंबई | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी – दौलत सरवणकर
मुंबईत अदानी इलेक्ट्रिक्सचे २७ ते ३० लाख ग्राहक असून ह्या ग्राहकांची मतं किंवा सूचना न ऐकता एकतर्फी स्मार्ट मीटर लावण्याच्या विरोधात *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे अदानी इलेक्ट्रिक्सविरोधात आज आंदोलन करण्यात आले. ह्यावेळी अदानी इलेक्ट्रिक्सचे व्यवस्थापकीय संचालक ह्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. ह्यावेळी शिवसेना नेते *आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू, माजी आमदार विलास पोतनीस, आमदार बाळा नर* तसेच मुंबईतील सर्व विभागप्रमुख, विभागसंघटक, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज,
