गुन्हेगारी | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी
चोरीचा बनाव करून फिर्यादीच मुख्य आरोपी वालचंदनगर पोलिसांनी फिर्यादी आरोपीसह चौघांना ठोकल्या बेड्या, वालचंदनगर पोलिसांची कामगिरी, संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.11 शेतकऱ्यांचे शेतमालाचे 42 हजार रुपये हडप करण्यासाठी जबरी चोरीचा बनाव करून पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधांत खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या पिकअप चालकांसह चौघांना वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पिकअप चालक गुणवंत पोपट रासकर मारुती शिवदास करे, गणपत देविदास पालखे,राजु श्रीमंत रासकर (सर्व राहणार सराफवाडी ) यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून गुणवंण पोपट रासकर हा इंदापूर तालुक्यांतून शेतकऱ्यांचा तरकारी,भाजीपाला घेवुन निमगांव केतकीमधील व्यापाऱ्यांना देत होता, तसेच व्यापाऱ्यांनी दिलेले पैसे ही शेतकऱ्यांना घरी नेवुन देत होता, यावेळी बाबू बनकर व लखन चव्हाण यांच्याकडून गुणवंत रासकर हा (दि. 6) डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचा शेतमालाचे पैसे घेवुन निघाला होता, यावेळी त्याला अडवून चौघांनी दोन लाख रुपये जबरदस्तीने काढून नेल्याची तक्रार रासकर यांनी वालचंदनगर पोलीस ठाणेत दाखल केली होती, मात्र चोरीचा बनाव करून फिर्यादीच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे, याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे एकूण 42,410 रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे पोलीस उपनिरीक्षक विजय टिळकीकर पो. हवा.गुलाबराव पाटील शैलेश स्वामी दादासाहेब डोईफोडे दत्तात्रेय चांदणे अजित राऊत विक्रमसिंह जाधव रणजित देवकर जगदीश चौधर यांनी पार पाडली आहे, त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वालचंदनगर पोलिसांनी सदर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
