रक्तदान | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
कोंढवे धावडे :- कोंढवे धावडे गावचे सुपुत्र माजी सरपंच भाजपा खडकवासला मतदार संघाची सरचिटणीस उमेश भाऊ सर पाटील यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत आपला वाढदिवस सार्थकी लावला.
अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने उमेश भाऊ सरपाटील यांना लक्ष्मी चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत तात्या धावडे, छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा नेते भगवानजी मोरे, सुवर्ण कमळ पतसंस्थेचे संस्थापक सुभाष भाऊ मोरे सा.का. सुधीरजी धावडे, महादेवजी धावडे, हे सर्वजण उपस्थित होते.
सर्वांच्या वतीने मा. उमेश भाऊ सरपाटील यांना त्यांच्या राजकीय सामाजिक सेवेत यश मिळो त्यांची कीर्ती वाढो अशा शुभेच्छा ही देण्यात आल्या…
खऱ्या अर्थाने रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करतात परंतु काळाची गरज ओळखत वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करणे म्हणजे एक प्रकारची देश सेवा करणेच होय आणि ते कार्य उमेश भाऊंनी वाढदिवसानिमित्त साध्य केलं असं मत यावेळी डॉक्टर गणेश राऊत यांनी व्यक्त केले.
