अहमदनगर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
जयहिंद साहेब असे म्हणत सातारा जिल्ह्यातील संभाजी पुरीगोसावी यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुखांची सदिंच्छा भेट घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत करीत त्यांच्या सेवेबद्दल विशेष कौतुक केले, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय साहेब राकेश ओला यांनी दिनांक 23 ऑक्टोंबर 2022 पासून पोलीस अधीक्षक म्हणून अहमदनगर जिल्ह्याचा तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त जागेवर पदभार स्वीकारला होता, तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही नगर जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली, मनोज पाटील यांनी पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, आजपर्यंतच्या इतिहासांत अहमदनगर ला डॅशिंग आयपीएस अधिकारी मिळाले आहेत, आयपीएस अधिकारी राकेश ओला हे ही सरळ सेवा भरतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती देखील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला उल्लेखनीय ठरली आहे, कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून राकेश ओला यांना ओळखले जाते, 2012 च्या तुकडीतील ते आयपीएस अधिकारी आहेत. श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती, त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने नगरसह संपूर्ण राज्यांत हौदोस घातला होता, या टोळीचा देखील त्यांनी चांगला छडा लावला होता, 2016 मध्ये त्यांची मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती, तर जून 2017 ला नागपुरांत पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती होती, नागपूरमध्ये ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षक म्हणून देखील त्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली, आणि नंतर त्यांची अहमदनगर ला पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती, जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून ते आजपर्यंत जिल्ह्यात नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत, पोलीस खात्यात प्रारंभ केल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी सुरुवातीपासून अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली होती, कोणत्याही परिस्थितीत शांतपणे काम करण्याची त्यांची शैली असल्यांने नागपुरात ते कुल ऑफिसर म्हणूनही ओळखले जात होते.
