चंपाषष्ठी | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य संपादक संतोष लांडे.
चंपाषष्ठी किंवा स्कंद षष्ठी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथी साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.
🌼 चंपाषष्ठी शुभ मुहूर्त 🌼
तिथी प्रारंभ – 6 डिसेंबर 2024 दुपारी 12 वाजून 5 मिनिटे
तिथी समाप्ती – 7 डिसेंबर 2024 सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी
🔴 खंडोबाचे नवरात्र.
🔴 चंपाषष्ठी पूजा विधी.
१.कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात. २.नवरात्राप्रमाणेच दरररोज फुलांच्या माळा वाढवत अर्पित केल्या जातात.
३.सहा दिवस नंदादीप लावतात.
४.या दरम्यान घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण-सुवासिनीला भोजनाला आमंत्रित करणे या प्रकारे उत्सव साजरा केला जातो.
५.चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो.
६.तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. ७.खंडोबाची तळी भरून आरती केली जाते.
८. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
तळी भरणे
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन “सदानंदाचा येळकोट” किंवा “एळकोट एळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
भंडारा
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड.
खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
🌼खंडोबाची पांच प्रतिके: 🌼
१) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते.
२) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते
३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात.
४) मूर्ती: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात.
५) टाक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.
🙏🏻खंडोबाची पूजा: 🙏🏻
खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते.
बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात.
घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते.
१.देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी.
२. कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे.
३. पूजा करताना फुले, गुलाल, व भंडार वहावा. ४. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत.
५. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.
६. पत्री: पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी.
७.देवासमोर सुगंधी धूप जाळावा.
८. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावे. ९.देवासमोर वाटींत दूध ठेवावे.
१०. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा.
११. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.
१२. देवाजवळ नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात.
१३.देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात.
१३.आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात. १४.सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा.
१५.मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.
१६. महानैवेद्य:
• सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात.
• खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात.
• महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.
• चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच.
• भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा.
•तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे.
•सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. • जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ‘ वारी खंडोबाची ‘ म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.आज चंपाषष्ठी निमित्त जय मल्हार मंदिर (भंडारआळी ठाणे) येथील खंडोबा आणि म्हाळसा आई चे दर्शन घेतले व सोबत
जय मल्हार मंदिराचे ट्रस्ट चे सचिव (सर्जेराव साहेब), कार्यकर्ते (ओमकार शेवाळे) अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे आपले ठाणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार (गणेश दळवी आणि डोंबिवली चे पत्रकार राहुल लिमये तसेच शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना उपविभाग अधिकारी कोळीवाडाचे (वरुण राजेंद्र मानकामे,) उपस्थित होते.तिथले हे काही आनंदाचे क्षण!जय भवानी जय मल्हार !