अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी. राज्यांचा गृहमंत्री कोण याबाबत चर्चा सुरू असतानाच कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील चार पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षात शनिवारी तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या जागी नियंत्रण कक्ष आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षात बदली झालेल्या अधिकारी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिकंदर लक्ष्मीपुरी चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर आणि गांधीनगरचे स.पो.नि. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव या अधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षात रवागणी करण्यात आली आहे. तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची शाहूपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक म्हणून तर शाहूपुरीचे पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांची लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्याकडे गांधीनगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत, या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित पोलीस ठाणेचा पदभार देखील स्वीकारला आहे, मात्र रात्री उशिरापर्यंत गडहिंग्लज पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली याची माहिती अद्याप समजू शकली नाही, अचानक बदल्यांमुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
