अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
🔹अन्य जिल्ह्यातील नियुक्ती आदेश देण्यात आले मात्र गडचिरोली जिल्हा मागे ?
🔹 उमेदवार तीन महिन्यांपासून प्रतिक्षेत ?
गडचिरोली प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीने सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अनेक वर्षेपासून प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची निवड यादी जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केली नाही. त्यामुळे नियुक्ती आदेश कधी मिळणार आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सरळ सेवा भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती आदेशही देण्यात आले आहेत. काही जिल्ह्यातील उमेदवार रुजू झाले मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर प्रक्रिया कासवगतीने का सुरू आहे हे न उलगडणारे कोडे आहे ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अजुन नियुक्ती आदेश मिळण्याची किती दिवस वाट पाहावी लागणार यांसारख्या अनेक प्रश्नांनी उमेदवार विचार चक्रात अडकले आहेत. . त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने, पराकोटीने लक्ष देण्याची गरज आहे. एक दशकापासून अधिक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करित असलेल्या उमेदवारांनी २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिराती नुसार सरळसेवा भरतीसाठी अर्ज भरून ठेवले होते. ती परिक्षा २०२४ मध्ये घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी होऊन बरेच दिवस झाले. राजकीय निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली आणि निवड यादी, नियुक्ती आदेश देण्याचे काम थंडावले. निवडून आलेल्या आलेल्या उमेदवारांचे स्वागत समारंभ, सत्कार उत्सव साजरे करण्यासाठी सुरुवात झाली मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य विभागात सरळ भरती नियुक्तीचे आदेश दिले नाही. ही जिल्हा परिषद प्रशासनाची कार्यकुशलता दाखविते.
