एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

Pune | विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोथरूड, पुणे आयोजित भव्य दुर्ग बांधणी स्पर्धा

पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : सुदाम येवले.

प्रखंडाने अगदी सुयोग्य पद्धतीने या दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते, छत्रपती संभाजी महाराज भागातील जवळपास १०० ते १५० जणांनी या स्पर्धमध्ये सह भाग घेतला होता.

“ही स्पर्धा फक्त मनोरंजनासाठी नाही, तर ती आपल्याला टीमवर्क, समर्पण, आणि परिश्रमाची महत्त्वाची शिकवण देण्यासाठी आयोजित केली होती. आपल्याला शिकायला मिळेल की, कसे एकमेकांची मदत करून, शिस्त आणि योग्य मार्गाने काम केल्यास आपली कल्पनाही किती मजबूत होऊ शकते.”

“ही स्पर्धा आपल्याला एकता, सहकार्य, आणि मेहनत यांचे महत्त्व सांगते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन,छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती संभाजी महाराज भागाचे विशेष संपर्क प्रमुख विवेक गिरी यांनी केले. यानंतर छत्रपती संभाजी महाराज भागाचे मंत्री शुभम जी मुळुक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले त्याच बरोबर ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश काय याचे महत्व पटवून सांगितले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन जी महाजन यांनी आजच्या या स्पर्धेच्या युगात गडकिल्ले प्रतिकृती बांधणी का करायची व कशासाठी करायची महाराजांनंतर आपल्या मावळ्यांनी,पूर्वजांनी या जोपासलेल्या वास्तू हा वारसा आपल्या पर्यंत पोहचवला हाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम आजच्या या तुमच्या आमच्या सारख्या मावळ्यांच्या खांद्यावर आहे याची एक जाणीव सर्वांना करून दिली.

त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मोहनजी शेटे सर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते ज्यांच्या वाणीतून विचार ऐकायला जमलेला तो जनसमुदाय, आपल्या वक्तृत्वाने इतिहासातील रोम हर्षक कथा अगदी उत्तम प्रकारे आपल्या भाषणातून सर्वांपर्यंत पोहोचवले व आपल्या वाणीने अक्षरशः श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.

यानंतर आभार प्रदर्शन भागाचे सह संयोजक चैतन्य बोडके यांनी केले सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विश्व हिंदू परिषद बजरंग दल छ्त्रपती संभाजी महाराज भाग, समिती सर्व प्रखंडातील कार्यकर्ते उपस्थित होते. व ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ते,भागाचे बजरंग दल जिल्हा संयोजक दत्तात्रय तोंड.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link