अमरावती | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : ज्योत्सना करवाडे
निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढत असताना आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचत आहे. प्रत्येक उमेदवार हा आपापल्या पद्धतीने मतदारांना रिझवण्याचे काम करीत आहे. राष्ट्रीय पक्षाचे दिग्गज आणि बलाढ्य उमेदवार रिंगणात असताना कोणत्याही मोठ्या पक्षांचे पाठबळ नसलेली एक सर्वसामान्य परिवारातील पण तितकीच कर्तुत्ववान उच्चशिक्षित महिला अपक्ष उभी राहून कुठलाही राजकीय गंध नसताना आर्थिक देणे बलाढ्यांसमोर कमकुवत असताना देखील मोठ्या मोठ्या उमेदवारांच्या तोंडाला फेस आणत आहे .आज अमरावती विधानसभा मतदार केंद्रात अनुष्काताई बेलोरकर ह्या प्रस्थापितांनी दखल घ्यावी अशी परिस्थिती निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत.
अनुष्काताई बेलोरकर ह्या एक बलुतेदार असून आपल्या आलुतेदार बलुतेदार समन्वय समितीनेच त्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे त्या एक उच्चशिक्षित एम टेक इंजिनिअरिंग असून विवेकी व सभ्य आहेत सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी असून प्रामाणिक निर्गवी व्यक्तिमत्त्वाच्या आहे. त्यांची अमरावतीच्या व सर्वसामान्यांच्या विकासाची आपली योजना आहे स्वप्न व तशी दृष्टी आहे त्या सामान्यांच्या समस्यांसाठी शासनासोबत निडरपणे लढणाऱ्या झुंजार तरुणी आहेत. युवकांच्या बेरोजगारीने माजी सैनिकांच्या सुयोग्य उपजीविकेसाठी; नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नसल्याने प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या बेरोजगार झालेल्या मुला-मुलींच्या करिता व मुलींवरती आणि महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांविरोधात पेटून उठणाऱ्या एक सामाजिक धडाडीच्या कार्यकर्ते आहे. त्यांनी अनेक सेवाभावी कार्य केली आहे आणि पुढेही करत राहणार आहेत त्या अहिल्यादेवी होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले आदर्श मानतात.
आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये ही लढाई त्रिफेर मधून चौफेर कडे रंगत असताना दिसून येत आहे तसेच अमरावती विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांचा कौल त्यांच्या दृष्टीने वाढत आहे. या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती विधानसभा मधील सर्व मतदार सर्व अनुष्काताई बेलोरकर यांच्याकडे वळत असल्याचं चित्र निर्माण होताना दिसत आहे.