नांदेड | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : सखाराम कुलकर्णी
नांदेड– भोकर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी हट्टाने आपल्या कन्येला उमेदवारी घेतल्यामुळे मतदारात प्रचंड राग व नाराजी दिसत आहे. यांची नाराजी दूर करण्यास अशोकरावांची दमछाक होत असून 2024 च्या लोकसभेसारखा यावेळेसही अशोक रावांना हिसका दाखवा असे मतदारात बोलल्या जात आहे.
अशोकराव चव्हाण स्वतःच्या बचावासाठी काँग्रेस सोडून भाजपात गेले. याचा राग नांदेड जिल्हा सह भोकर मतदार संघात आहे. त्यात आता कन्या श्रीजया हीस भोकर मतदारसंघात भाजपा काढून उमेदवारी घेतली याचाही राग मतदारात निर्माण झाल्याचे दिसते. ही घराणेशाही कुठपर्यंत चालवायची हा प्रश्न मतदार विचारत आहे . त्यामुळे मतदारात राग निर्माण झाल्याचे दिसते. श्रीजयास लोकांची काम काय असतात, कशी करावी याचं ज्ञानही नाही .राजकारणात प्रत्यक्ष कधीही आलेल्या नसताना अशोकरावांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण आमदार झाल्या होत्या. त्यावेळेस त्यांच्या कामाच्या शैलीवर भोकर तालुक्यातील जनता प्रचंड नाराज झाली होती . कारण त्यावेळी त्यांनाही राजकारणाचा अनुभव नव्हता. नंतर या नाराधीचा फटका अशोकरावांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःला दिसून आला होता. व 2024 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यावर 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत अशोकरावावरील मतदारांचा असलेला रागाचा फटका प्रतापराव पाटील यांना बसून प्रतापरावांचा पराभव झाला हे नांदेड जिल्हा ओळखून आहे. व आता कोणतेही राजकारणाचे ज्ञान नसताना श्रीजया यांना उमेदवारी दिली व निवडणून आल्यावर सौ. अमिता चव्हाण यांच्यासारखाच कारभार श्रीजया करतील असे मतदारात बोलल्या जात आहे. कारण प्रत्येक सभेत भोकर चा विकास करण्यास मी जबाबदार आहे. असे अशोकराव सांगतात म्हणजे श्रीजया फक्त आमदाराचे पद घेऊन बसणार का असा सवाल भोकर मतदार संघातील जनता विचारत आहे. या अशा मतदारांची नाराजी दूर करण्यास अशोकरावांना भोकरच्या बाहेर इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी जाता येत नाही. भोकर मध्येच ठाण मांडून त्यांची दमछाक झालेली दिसत आहे.