पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : प्रशांत काजळे.
महाराष्ट विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर. राष्ट्रीय धर्म हिंदू संगठन राज्य कार्यकारिणीची दिनांक १५/११/२०२४ रोजी शिवाजीनगर पुणे येथील हॉटेल अवध येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये संघटनेचे अध्यक्ष श्री हंसराज पाटील, उपाध्यक्ष श्री गोपाळ भालेराव, सचिव श्री अमोल सोमवंशी कोषाध्यक्ष श्री संतोष लांडे संपर्क प्रमुख श्री गजानन कवडे उपस्थित होते .
या बैठकीत महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणूक २०२४ विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या महाराष्ट्रात संघटनेचे १५/२० जिल्ह्यात विविध सामाजिक,सांस्कृतिक धार्मिक कार्य सुरू आहे. त्या क्षेत्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या सुरुवातीपासून सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदान जागृती अभियान करून मतदाराला” मतदान बूथ , पर्यंत घेऊन जाऊन त्यांच्या कडून मतदान करून घेऊन ” लोकशाहीला बळकट ,करून महाराष्ट्राची सुसं संस्कृति, उद्योग, विकास परंपरा त्याची ध्येय धोरणे, मजबूत व स्थिर सरकार असेल तर टिकून राहील यासाठी सर्वानी मिळून योग्य उमेदवारालाच आपले” अमूल्य मत , देउन राज्याला व देशाला विकासशील देशाच्या यादीमध्ये कायमस्वरूपी स्थान दिले पाहिजे यामुळे आपली भावी पिढी सुरक्षित राहील. व संघटनेचे बरेच महत्त्वाचे मुद्दे चर्चेत घेवून लवकरच अमलात आणण्यात येतील असे सर्वानुमते ठरवण्यात आले.
