अमरावती | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी गोपाळ भालेराव
महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत महत्वाचा सल्ला. फसवणूक करणाऱ्यांचे चप्पल जोड्याने स्वागत करावे. अमरावती/ प्रतिनिधी दि. १४/११/२०२४:- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जन जनवादी पार्टीच्या वतीने अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करण्याची मोहीम प्रदेशाध्यक्ष अर्जून कुमार राठोड यांनी राबविण्यासाठी प्रयत्न केले. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज (एबी फार्म) देऊन निवडणुकीसाठी लागणारी सर्व साधने, सामुग्री आणि चाळीस लाख ते नव्वद लाख रुपये प्रत्येक उमेदवाराला देण्याचे आश्वासनही अर्जून कुमार राठोड यांनी उमेदवारांना दिले. अनेक ठिकाणी एका किरायाच्या वाहनाने घरपोच एबी फार्म देण्याची मोहीम राबवली. मात्र निवडणूक लढविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहकार्य केले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले जन जनवादी पार्टीचे उमेदवार हताश होऊन चिडून आहेत. अशाप्रकारचे खोटे आश्वासन देणाऱ्या अर्जून राठोड आणि संजय चव्हाण यांच्या गळ्यात चप्पल जोड्यांचे हार घालून महाराष्ट्रभर मिरवणूक काढली पाहिजे असे मतही उमेदवारांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यासाठी एबी फार्म आणि खोटे आश्वासन देऊन महाराष्ट्रातील उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या कारवाई केली जाणार असल्याचे अनेक उमेदवारांनी सांगितले. त्यामुळे अर्जून कुमार राठोड हे महाराष्ट्रातील पुसद आणि भोकर येथे निवडणुक लढवित असले तरी मतदारांनी अशा फसव्या नेत्यांपासून सावधगिरी बाळगावी. मतदारसंघात फसव्या प्रचाराला बळी पडु नये.असे मतही अनेक ठिकाणी व्यक्त केले आहे. अर्जून राठोड यांनी उमेदवारांना एबी फार्म देत , आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे अनेक उमेदवार वाट पहात होते. त्यासाठी स्वतंत्र बॅंक खातें उघडायला लावले . निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली तरीही अर्जून कुमार राठोड यांनी पैसे पाठविले नाही. आणि फोनवरही बोलणे बंद केले. त्यामुळे हळूहळू विश्वास उडाला. मात्र निवडणूक लढविण्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपले लाखो रुपये खर्च केले. आणि फसव्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाचे बळी ठरले. अशा अर्जून कुमार राठोड आणि संजय चव्हाण यांच्या फसव्या प्रचाराला बळी न पडता महाराष्ट्रातील मतदारांनी जागृत राहून मतदान करावे.