जळगाव | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव.
जळगाव :आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी एरंडोल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग केलेल्या रुग्णाला जळगावला जात असताना १०८ क्रमांक रुग्णवाहिकेला जळगाव शहरातील दादावाडी पुला जवळ आली असताना अचानक गाडीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचे. चालकाच्या लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगवधान राखून गाडी थांबून. गाडी मधील स्वतः.माता. बाळ. आणि डॉक्टर यांना बाहेर काढून गाडी जवळून लांब नेले. काही वेळातच रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट झाला.राहुल पाटील (वय ३० वर्ष रा.सकारे ता. धरणगाव )असे चालकाचे नाव आहे. तो धरणगाव ग्रामीण रुग्णालय येती रुग्णवाहिका १०८ वर कार्यरत आहे.
(के.सी.एन.) दरम्यान मनीषा रवींद्र भिल (वय २५ रा.बामणे ता. एरंडोल )हि गरोदर महिला त्रास होऊ लागल्याने जवळच्या जवडेसिम आरोग्य केंद्रात गेली होती. तेथेच त्यांची प्रसूती झाली.नंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.एरंडोल ग्रामीण रुग्णालयात तपासणी कारण्यात आल्या नंतर माता व बाळ यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रेफर करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी धरणगाव येथील १०८ रुग्णवहीका बोलावण्यात आली.(केसीएन)चालक राहुल पाटील हा रुग्णवहीका क्र. (MH14CL0711)एरंडोल येथे आले.तेथून मनीषा भिल व त्यांचे नवजात बाळ घेऊन डॉ. रफिक अन्सारी यांच्यासह राहुल पाटील यांनी रुग्णवाहिकेतुन एरंडोल ते जळगाव प्रवास सुरु केला दरम्यानजळगाव शहरातील दादावाडी पुलावर रुग्णवाहिका आली असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे स्पार्किंग झाल्याचे राहुल पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पुलावर एका बाजूला रुग्णवाहिका थांबून. खाली उतरून रुग्णवाहिकेतील डॉ. रफिक अन्सारी.रुग्ण मनीषा भिल व त्यांचे बाळ यांना बाहेर काढत लांब घेऊन गेले. त्या नंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.तेवढ्यात आगीने गाडीवर पूर्ण ताबा घेतला होता. काही काळानंतर गाडीतील सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. दरम्यान जळगाव महानगरपालिकेच्या दोन अग्निशमक बंबाने येऊन आग विझलवली. मात्र तो पर्यंत रुग्णवाहिका पूर्ण जळून खाक होऊन संगाडा उरला होता.
चालक राहुल पाटील यांच्या समयसूचकतेमुळे चौघाचे प्राण वाचल्यामुळे त्यांचे सर्वोतपारी कौतुक होत आहे.
