पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमधील आयएमडीआर कॉलेजमधून 43 बॅटऱ्या चोरणारे चोरटे 12 तासांच्या आत पोलीसांच्या जाळ्यात, डेक्कन पोलिसांची कामगिरी, पुणे शहर (संभाजी पुरीगोसावी ) प्रतिनिधी. पुणे शहर डेक्कन पोलीस ठाणेच्या हद्दीमधील फर्ग्युसन महाविद्यालच्या असलेल्या एमडीआर कॉलेजच्या युपीएस रूममधील रॅकमधून जवळपास 43 बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. सचिन शहाजी डोकडे (वय २१) रा.आकाशगंगा सोसायटी समोर वडारवाडी) राहुल यंकाप्पा पाथरुट (वय 20) रा. जुनी वडारवाडी ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून रूम मधील जिन्याखालील असलेल्या रॅकमधून जवळपास 43 युपीएस बॅटरी चोरीला गेल्याची तक्रार 4 नोव्हेंबर रोजी डेक्कन पोलीस ठाणेत दाखल झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तांत्रिक पुराव्यांच्या माध्यमांतून 12 तासांच्या आत दोन आरोपींना निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे. सदर आरोपींच्या कब्जांतून चोरीला गेलेल्या सर्व बॅटरी हस्तगत करण्यात आल्या आहेत.स.पो.नि. डी.जी शिंदे पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रवीणकुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीजा निंबाळकर गुन्हे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे अजय भोसले दत्तात्रय सावंत सहा.फौ.शिंदे राजेंद्र मारणे नरेंद्र पवार सागर घाडगे वासिम सिध्दीकी धनाजी माळी रोहित पाथरूट यांच्या पथकांने केली आहे.
