वसुंधरा फाउंडेशन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : सुदाम येवले.
वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्ताने गुजरवाडी येथील ममता फाउंडेशनमध्ये मराठी हिंदी सुमधुर गीतांचा व फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न. ममता फाउंडेशनमध्ये एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांचे संगोपन व शिक्षण केले जाते. गेली अनेक वर्षे शिल्पा बुडूख हे कार्य आईच्या ममतेने करत आहेत. त्यांच्या या कार्यास हातभार लावण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत एक छोटीशी मदत. मदतीचा एक हात पुढे करून माणुसकीचे नाते व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. ममता फाउंडेशन मधील या मुलांचे मनोरंजन करण्यासाठी सुरेल गीतांचा कार्यक्रम आयोजित केला व यासाठी गायक पांडुरंग मोटे, मुर्तुजा शेख, संस्थेचे सचिव शैलेंद्र निर्मळे, शुभदा ताई कोकिल व प्रज्ञेश गोसावी या गायकांनी मोलाचे योगदान दिले. या सर्व गायकांनी सुरेल आवाजात एक से बढकर एक गाणी सादर करून संपूर्ण वातावरण संगीतमय व आनंदमय केले. मुलांनी पण अतिशय उत्स्फूर्तपणे गाण्यांवर डान्स केला व खूप एन्जॉय केले. शैलेंद्र निर्मळे यांच्या “किसी की मुस्काराहटोपे हो निसार” हे गाणे सादर करत असताना मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला व खरंच खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व हास्य पाहून सर्वांना समाधान लाभले. वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका योगिताताई गोसावी यांचा मुलगा प्रज्ञेश गोसावी याचा वाढदिवस या मुलांच्या सोबत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. रामकुमार गुगळे, एलिस लोबो, श्यामल मोरे, राजश्री नाळे, स्वप्नील तलाठी व विष्णू भोसले यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला याबद्दल सर्वांचे तसेच सर्व गायकांचे व ममता फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद.
