कुस्ती | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : समाधान पाटील
स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथील इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी कु. तेजस्विनी नामदेव बडगुजर हिचा कुस्ती स्पर्धेत नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक व राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने भव्य सत्कार व गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. डी. चौधरी सर होते. तसेच व्यासपीठावर उपप्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव सर,पर्यवेक्षक श्री. के. पी. पाटील सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. सचिन चव्हाण सर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री. वाय. पी. चिंचोरे सर ,ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एम. पिंगळे सर, श्री.एस.सी. बाविस्कर सर,श्री.एस.एम.नेतकर सर,तसेच क्रीडाशिक्षक श्री .मयूर जाधव सर,श्री. राहुल गिरासे सर,तेजस्विनी चे वर्गशिक्षक श्री. अमोल चौधरी सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ.पी.पी. चव्हाण मॅडम,सौ.श्रुती पाटील मॅडम तसेच तेजस्विनी चे वडील श्री. नामदेव बडगुजर आणि त्यांच्या पत्नी,तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी श्री. गजानन बडगुजर, श्री. सुनील पंडित अहिरे,श्री. ज्ञानेश्वर मंगल बडगुजर, तेजस्विनी चे प्रशिक्षक श्री. दिनेश पाटील सर तिचे आजी आजोबा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथमतः कु. तेजस्विनी नामदेव बडगुजर हिचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य श्री. पी.डी .चौधरी सर व सर्व शिक्षकांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. तद्नंतर तेजस्विनी बरोबर आलेले तिचे पालक आई-वडील, काका,मामा, आजी आजोबा, प्रशिक्षक दिनेश पाटील सर यांचा सर्वांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच श्री. नामदेव बडगुजर तिचे काका गजानन बडगुजर यांनी त्यांच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी .डी. चौधरी सर,उपप्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव सर,पर्यवेक्षक श्री. के. पी. पाटील सर, श्री. वाय. पी. चिंचोरे सर ,श्री. अमोल चौधरी सर, श्री. मयूर जाधव सर ,श्री गिरासे सर, सौ. चव्हाण मॅडम, सौ .श्रुती पाटील मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.जी. डी. बच्छाव सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या. तिची उत्तरोत्तर प्रगती होवो असा आशीर्वाद ही दिला. अध्यक्षीय भाषणातून श्री. पी .डी. चौधरी सर यांनी तालुका स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत तेजस्विनी ची निवड कशी झाली हे सांगितले. ‘यशवंत हो किर्तीवंत हो’ असा आशीर्वाद ही दिला. तद्नंतर तेजस्विनी ची विद्यालयातून म्हसावद गावात खुल्या वाहनातून ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. या खुल्या वाहनाची (ओपन कारची) व्यवस्था श्री. पराग पाटील सर यांनी केली.मरी माता चौक, इंदिरानगर,पाटील वाडा, बाजार पट्टा आणि परत विद्यालयात त्या मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकी दरम्यान गावातील अनेक माता भगिनींनी तिचे औक्षण केले. तिला आशीर्वाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री. वाय. पी. चिंचोरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अनमोल असे सहकार्य केले.
त्याचप्रमाणे तेजस्विनीच्या माहीजी गावातही तिची तशीच मिरवणूक काढण्यात आली.माहिजी गावात ग्रामपंचायत येथे तिचा सत्कार करण्यात आला या ठिकाणीही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी .डी. चौधरी सर होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर श्री.जी. डी. बच्छाव सर माहिजी ग्रामपंचायत सरपंच श्री. कैलास नारायण पाटील, ग्रामसेवक विद्यालयातील सर्व शिक्षक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माता-भगिनी उपस्थित होत्या. ग्रामपंचायत च्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत आणि विद्यालयाच्या वतीने कु. तेजस्विनीचाही सत्कार करण्यात आला या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विलास गायकवाड सर यांनी केले.तद्नंतर तेजस्विनी ची कार मधून ग्रामपंचायत पासून महिजी देवी मंदिर तर तिच्या घरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली. तसेच श्री. नामदेव बडगुजर यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांना त्यांच्या घरी अल्पोपहार देण्यात आला आणि या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली.