दुःखात निधन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी (सातारा)
कै.रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी यांचे अचानक निधंन, संपूर्ण पुरीगोसावी कुटुंबाला मोठा धक्का, संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. कोरेगांव तालुक्यातील करंजखोप गावचे सुपुत्र कै. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ ( तात्या ) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी सातारा येथे त्यांच्या वास्तव्यांस असणाऱ्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी अचानक निधंन झाले, तात्यांनी आजपर्यंत आपल्या वैवाहिक जीवनाचा प्रवास, अतिशय संयमी आणि प्रेमळ ठेवला होता. स्वप्नात देखील आम्हांला वाटलं नव्हतं असा प्रसंग येईल म्हणून, आदिमाया भजनी मंडळ आई अंबाबाई तुळजापूर मातेचे जागर गोंधळ करीत होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क देखील सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर मुंबई पर्यंत होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे आज संपूर्ण जनसमुदाय तसेच पुरीगोसावी कुटुंब हे पोरके झाले आहे. तात्यांची आठवण आमच्या कुटुंबालाच नव्हे तर संपर्कांतील जनसमुदायाला कायम भासणार आहे. दोनच दिवसापूर्वी गावची यात्रा होती. कुटुंबामध्ये यात्रा आणि दिवापावलीची धामधूम सुरू होणार होती. या ऐंन सण उत्सवांत पुरीगोसावी कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तात्यांचे नेतृत्व म्हणजे तात्या माझी चुलते होते, पण त्यांनी कधीही चुलतेच्या नात्याप्रमाणे राहिले नाहीत, वडिलांच्या निधनानंतर कायम माझ्यावर लक्ष आणि माझ्या संपर्कात होते. आजपर्यंत त्यांनी माझ्याकडून काही चुकी झाल्यास कधीही माझ्या अंगाला चार बोटे देखील लावली नव्हती, नेहमीच आमचा संभा म्हणून आवाज त्यांचा मला होता. खरंच तात्या तुम्ही आता आपल्या कुटुंबाला कधी भेटणार..! तात्या मी तुमची वाट पाहतोय ..! माझ्यावर लक्ष कोण ठेवणार मला कोण समजून सांगणार तुमच्याशिवाय आता या जगामध्ये माझं कोणी नाही. तात्या यांना परत पत्नी जीजी तुमची तीन मुलांना आणि आपल्या कुटुंबाला तुम्ही कधी भेटणार..! तात्या तुमच्या अचानक जाण्यामुळे आज आपला कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, माझ्या पुतण्या पत्रकार आहे. त्याची पोलीस महसूल खात्यातील अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे असे कोण म्हणणार आता..! आमच्या तात्यांच्या पश्चांत पत्नी सुना नातवंडे मुलगी तीन मुले पुतणे भाऊ आत्या असा मोठा परिवार आहे.