कल्याण | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी गणेश तळेकर.
कल्याण :- बालरंगभूमी परिषद मध्यावर्तीच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के – सामंत यांच्या संकल्पनेतून दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव ” *यहाँ के हम सिकंदर* “१८ ऑक्टोबर २०२४ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित,बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा संचलित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यावर्तीच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के – सामंत,कार्याध्यक्ष श्री.राजू तुलालवार, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष श्री.रविंद्र सावंत, उपाध्यक्ष श्री अण्णा हांडूरे, ज्येष्ठ नत्यादिग्दर्षक श्री.रामदास काळे या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या समयी कल्याण शाखेचे अध्यक्ष श्री.सतिश देसाई , कार्याध्यक्ष श्री.शिवाजी शिंदे, प्रमुख कार्यवाह श्रीमती.सुजाता कांबळे – डांगे,उपाध्यक्षा श्रीमती.प्रिती बोरकर,कोषाध्यक्ष श्री.दिपक चिपळूणकर, सहकार्यवाह श्री.संजय गावडे व श्रीमती.सुनिता देसाई,श्री योगेश कल्हापुरे व्यासपीठावर उपस्थित होते. तर कार्यकारिणी सदस्य श्री.विशाल पितळे, श्री.सौरभ रमेश आरोटे, श्रीमती.मीनल ठाकोर, श्रीमती.सुरेखा गावंडे, श्रीमती.मेघा शृंगारपुरे, श्री.चेतन दुर्वे, श्री.भूषण मेहेर, श्रीमती.दिपाली पितळे, श्रीमती.मेहेर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्याध्यक्ष श्री.शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले व अध्यक्षा ॲड.निलम शिर्के – सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांग बालकलावांतांचे भरभरून कौतुक करून कलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व महोत्सवाचे भव्यदिव्य देखणे आयोजन बघून कल्याण बालरंगभूमी परिषदेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
या कलामहोत्सवामध्ये १४ दिव्यांग शाळेतील दोनशे कलाकारांनी सहभाग घेतला होता.दिव्यांग बालकलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सदरीकरणांनी सर्व रसिक प्रेक्षक भारावून गेले आणि रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्तम प्रतिसाद दिला. व कल्याण शाखेला उत्तम नियोजन करून कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रवींद्र सावंत, जेष्ठ नाट्यदिग्दर्षक श्री.रामदास काळे, श्री.अण्णा हांडोरे,श्री. हेमंत यादगिरे उपस्थित होते.बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा कार्याध्यक्ष श्री.शिवाजी शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे अत्रे रंगमंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
श्री.विकास सोनवणे आणि श्रीमती.सुजाता कांबळे – डांगे यांनी संपूर्ण कलामहोत्सवाचे निवेदन केले.