बुलेट चोरटे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी.
बुलेट चोरटे चाकण पोलिसांच्या जाळ्यात, 11 बुलेट इतर 7 दुचाकी असा एकूण 26 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, चाकण पोलिसांची दमदार कामगिरी, संभाजी पुरीगोसावी (पिंपरी चिंचवड) प्रतिनिधी. चाकण पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये गेम मध्ये लाखों रुपये हरवल्यामुळे पैसे कमावण्यासाठी बुलेट चोरी करणाऱ्या आरोपीना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच बुलेट विक्रीमध्ये सहभागी असलेल्या चार जणांना देखील पोलिसांनी ताब्यांत घेतले आहे. मुख्य आरोपी अभय सुरेश खुडे हा युट्यूबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून चोरी करीत असल्यांचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्या अनुषंगाने चाकण पोलिसांच्या या कारवाईत ११ बुलेट आणि ७ दुचाकी असा एकूण 26 लाख रुपये किंमतीच्या 18 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी हा गेममध्ये हरल्याने तो बुलेट चोरीकडे वळाला. मात्र युट्युबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून बुलेट चोरी करायला शिकला. अभयाने केलेल्या बुलेट चोरी या मित्रांच्या मदतीने हजारांत बुलेट विकत असे मिळालेल्या पैशांतून पुन्हा ऑनलाईन गेम खेळायचा मात्र बुलेट चोरीची प्रकरण अखेर चाकण पोलिसांच्या डायरीत नोंद झाल्याने त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करीत असताना मुख्य आरोपी अभय कुठे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तसेच अनेक सी.सी.टीव्हीत कॅमेऱ्यात तो बुलेट चोरताना कैद देखील झाला होता. पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करून फरार आरोपी अभय खुडेला संगमनेरमधून सापळा रुचून अटक करण्यात आली आहे. अभय सुरेश खुडे रवींद्र निवृत्ती गव्हाणे शुभम बाळासाहेब काळे यश नंदकिशोर थट्टे व प्रेम भाईदास देवरे अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौंबे शशिकांत महावरकर सहा.पोलीस आयुक्त वसंत परदेशी डॉ. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 3 डॉ . शिवाजी पवार सहा.पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) नाथा घार्गे तपास पथकांचे प्रमुख स.पो.नि. प्रसंन्न जराड स.पो.नि. गणपत धायगुडे पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे भैरोबा यादव सुनील शिंदे शिवाजी चव्हाण राजू जाधव रुषीकुमार झनकर सुदर्शन बर्डे सुनील भागवत महेश कोळी महादेव विक्कड देवनाथ खडेकर शरद खैरनार नितीन गुंजाळ किरण घोडके माधुरी करणारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.