शाहिद जवान अविनाश भोसले | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी.
शहीद जवान अविनाश हरिश्चंद्र भोसले यांना शासकीय मानवंदना देवुन अखेरचा निरोप, पुरंदर तालुक्यांतील जनसमुदाय लोटला, भोसले कुटुंबीयांचा मोठा आक्रोश, संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. भारत मातेचे रक्षण करीत असताना असताना पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यांतील भोसलेवाडी गावचे सुपुत्र अविनाश हरिश्चंद्र भोसले यांचे अंबाला येथे सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झाल्याची माहिती लष्करी सैनिक विभागांकडून मिळाली आहे, जवान अविनाश हरिश्चंद्र भोसले यांच्या निधनाची बातमी समजताच भोसले कुटुंबासह भोसलेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जवान अविनाश भोसले हे कुटुंबातच नव्हे, तर भोसलेवाडी गावातील ग्रामस्थ व मित्र परिवारांचे लाडके होते. गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यांच्या पार्थिंवाची भोसलेवाडी ग्रामस्थांना आतुरता लागून राहिली होती. अखेर बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिव भोसलेवाडीत आणण्यात आले यावेळी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले, यावेळी पत्नीसह कुटुंबियांने एकच आक्रोंश केला. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणवले, त्यानंतर सजवलेल्या वाहनांतून त्यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भोसलेवाडी ग्रामस्थांसह परिसरांतील जनसमुदाय उपस्थित होता. भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे अमर रहे अविनाश भोसले अमर रहे ! अशा घोषणांनी भोसलेवाडी दुमदुमली होती. त्यानंतर जड अंतःकरणाने अविनाश भोसले यांना निरोप देण्यात आला. यावेळी लष्करी विभागाचे कर्नल व त्यांचे सर्व सहकारी जेजुरी पोलीस ठाणेचे स.पो.नि. दिपक वाघचौरे त्यांचे सर्व सहकारी, यांच्यासह पुरंदर तालुक्यांतील राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी भोसलेवाडी गावच्या ग्रामस्थ पोलीस पाटील, आजी-माजी सैनिक तसेच वारकरी संप्रदाय अशा विविध क्षेत्रातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. शहीद जवान अविनाश भोसले यांच्या पश्चांत आई वडील पत्नी व पाच वर्षाची मुलगी भाऊ भावजय चुलते बहीण भावजी असा परिवार आहे.