चिखली | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक : संतोष लांडे/ किरण सोनवणे.
चिखली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गृह कर्ज घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्याखालील आरोपी आकाश चिंचवडे याला जिल्हा व सत्र न्यायालय पुणे या न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
सदर प्रकरणांमध्ये आरोपितर्फे ॲड. अजिंक्य मिरगळ यांनी युक्तीवाद केला. ॲड. अजिंक्य मिरगळ यांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की सदरच्या गुन्ह्यामध्ये बनावट कागदपत्रांमध्ये आरोपी आकाश चिंचवडे याचा काहीही संबंध नाही. याऊलट सदर गुन्ह्यामध्ये असणारे मूळ आरोपी यांनी अर्जदार आरोपी आकाश देविदास चिंचवडे यांचीच फसवणूक केलेली आहे. तसेच सदरचा गुन्हा हा केवळ आणि केवळ कागदोपत्री पुराव्यांच्या आधारावर असुन ती कागदपत्रे गुन्हे तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत त्यामुळे अर्जदार आरोपी कडून त्याबाबत कोणतीही जप्ती कऱण्यात आलेली नाही. तसेच सदरचा गुन्हा जून 2023 मधे दाखल होऊन देखिल FIR मधे अर्जदार आरोपीचे नाव दाखल झाले नसल्याने त्याला जामीनावर सोडण्यात यावे असा युक्तीवाद केला.
सदर प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मा. व्ही. व्ही. नाशिककर साहेब यांनी अर्जदार आरोपी आकाश चिंचवडे याचा अटकपूर्व जामीन अर्ज विविध अटी व शर्ती वरती मंजुर केला.
सदर प्रकरणी ॲड. अजिंक्य मिरगळ यांना ॲड. ओंकार चंद्रशेखर इनामदार व ॲड.अरविंद तात्याराम मिसाळ यांनी सहकार्य केले.