कराड | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | सातारा जिल्हा प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षकपदी पुन्हा के.एन. पाटलांची नियुक्ती, पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी केली होती बदली, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मॅट न्यायालयाकडूंन दिलासा, संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांची तीन दिवसांपूर्वी रात्रीत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडूंन झालेली तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या बदली प्रकरणी मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजेच मॅट न्यायालयाने अखेर गुरुवारी महत्वपूर्ण निर्णय देत त्यांच्या नियमानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांची करण्यात आलेली बदली रद्द ठरवली आहे. कराड शहर पोलीस ठाणेचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांची दोन दिवसांपूर्वी तडकाफडकी बदली झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांना कराड शहर पोलीस ठाणेत संधी देण्यात आली होती. त्यांनीही पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून कराड शहर पोलीस ठाणेत आपला पदभार स्वीकारला होता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना कराड शहर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारून अवघे आठ महिने झाले होते, त्यांनी कराड शहर पोलिस ठाणेचा पदभार घेतल्यापासून सर्वाधिक कामगिरी व अनेक गुन्हे उघडकीस आणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, केवळ आठ महिन्यांचा कालावधी होताना होता ना, होता तोच त्यांची मागील तीन दिवसांपूर्वी अचानक बदली झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षकांकडून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी आपल्या चुकीच्या झालेल्या बदलीबाबत थेट मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजेच मॅट न्यायालयाकडे धाव घेत. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्णयाच्या विरोधांत मॅटमध्ये धाव घेतली होती. के.एन. पाटील यांची तडकाफडकी बदलीचे आदेश आले होते. पाटील यांची प्रशासकीय कारणांस्तव बदली झाल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अमोल ठाकूर यांनी सांगितले होते . या प्रकरणी अखेर मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजे मॅट न्यायालयाने गुरुवारी महत्वपूर्ण निर्णय देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन पाटील यांची झालेली बदली अखेर रद्द करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी कराड शहर पोलीस ठाणेचा पुन्हा पदभार स्वीकारला. अखेर मॅट न्यायालयाकडूंन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना दिलासा मिळाला आहे.
