एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका सरचिटणीसपदी गणेशराव खिस्ते

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक‌ : संतोष लांडे/किरण सोनवणे.

=============

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील दैनीक महाभुमीचे पत्रकार गणेशराव खिस्ते यांची नुकतीच माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीचे राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांनी खिस्ते यांना सदर पदाचे लेखी नियुक्तीपत्र दिले असून या पत्रात माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारिता चळवळ सशक्त करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण नमूद केले आहे. समितीची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबविण्याची जबाबदारी आपणावर सोपवित आहोत. आपण कायदे आणि संघटनेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भारतीय अभिप्रेत संविधानाला शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्कांसाठी बांधील राहून आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, असे सांगितले. सदरील नियुक्ती जालना जिल्हा सचिव श्री जगन्नाथ घोडे यांच्या शिफारशीनुसार देण्यात आली आहे श्री गणेशराव खिस्ते यांची तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्यामुळे त्यांचे परिसरातुन अभिनंदन होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link