एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Search
Close this search box.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Search
Close this search box.
Best News Portal Development Company In India

विनयभंग प्रकरणाच्या निषेधार्थ ठाणेकर रस्त्यावर, भंडारआळी ते मासुंदा तलाव मोर्चा; राज ठाकरे पोलिसांशी चर्चा करणार

ठाणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | ठाणे ‌जिल्हा प्रतिनिधी‌ : गणेश दळवी.

ठाणे‌ शहरात ११ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन मिळाल्याने संतप्त ठाणेकरांनी गुरुवारी शहरात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या मोर्चाआधीच आरोपीला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बुधवारी रात्री ताब्यात घेतले आहे. या मोर्चात उपस्थित नागरिकांनी ‘लाडक्या बहिणीला अनुदान आणि बालिकेवर अत्याचार’ अशा घोषणा देत ठाण्यातील भंडार आळी येथून निघालेल्या मोर्चात संताप व्यक्त केला. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा मोर्चा समाप्त झाला.

काय आहे नेमकं प्रकरण ?

एका इमारतीमध्ये पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एका ५५ वर्षाच्या व्यक्तीविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. या प्रकारानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

आरोपीला जामीन झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोर्चाची हाक दिली होती. यामध्ये सर्वसामान्य ठाणेकरांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप, मनसेचे स्थानिक नेते सहभागी झाले.

संतप्त नागरिकांचा रस्तावर उतरुन मोर्चा…

बदलापूरला एक न्याय, ठाण्याला एक न्याय… चालणार नाही, बालकांवरील अन्याय सहन करणार नाही, आरोपीला कडक शासन झाले पाहिजे,

अशा आशयाचे फलक घेऊन संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी सकाळी दहा वाजता ठाण्यात दाखल होणार आहेत. शहरातील मनसे नेते व पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे भेट घेणार असून त्यांच्याशी विधानसभा निवडणुकांबाबत बैठक घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे विनयभंग प्रकरणाबाबत पोलिसांशी चर्चा करणार असल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले. मनसे नेते अभिजित पानसे यांनीही ११ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्या प्रकरणात राज ठाकरे पोलिसांशी चर्चा करणार असल्याची माहिती आमचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर व गणेश दळवी यांना दिली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

  • AI Tools Indexer
  • Market Mystique
  • Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link