एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Search
Close this search box.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Search
Close this search box.
Best News Portal Development Company In India

राज्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू, राजकीय व पक्ष उमेदवारांनी नियमांचे पालन करा.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.

राज्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू, राजकीय व पक्ष उमेदवारांनी नियमांचे पालन करा, पुरीगोसावी ( प्रतिनिधी ) केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रांत आणि झारखंड मधील विधानसभा निवडणुकीच्या घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यांत एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रांत 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे, झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिला टप्पा पार पडेल तसेच 23 नोव्हेंबरला झारखंडमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित राज्यांत आचारसंहिता ही लागू झाली आहे. या काळात सरकारी यंत्रणा निवडणूक आयोगांच्या नियंत्रणाखालीच कार्य करतात मतदान आणि मतमोजणी झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता उठवली जाते पण आदर्श आचारसंहिता म्हणजे काय आणि नियम आणि कायदे काय आहेत असे प्रश्न उपस्थित होतात त्या संदर्भात जाणून घ्या… ( काय असते आचारसंहिता ) देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम बनवले आहेत निवडणूक आयोगांच्या या नियमांना आचारसंहिता असे म्हणतात, लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान या नियमांचे पालन करणे ही सरकार,नेते आणि राजकीय पक्षाची मोठी जबाबदारी असते, ( आचारसंहिता कधीपासून लागू होते आणि किती दिवस लागू राहते ) निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते, (आचारसंहितेचे नियम काय असतात) निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणतेही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने,बंगले विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही याशिवाय कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असते, निवडणुकीचे कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगांची परवानगी घ्यावी लागते, एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर निवडणूक आयोगांच्या नियमानुसार कारवाई केली जाते, आचारसंहितेचे नियम मोडणाऱ्या संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते, उमेदवारांने अथवा राजकीय पक्षाने नियम मोडल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो, इतकेच नव्हे तर संबंधिताला कारावासांच्या शिक्षेची तरतूदही करण्यात येत, आचारसंहितेत राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांसाठी कशा पद्धतीने वर्तन करावे, या संबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

  • AI Tools Indexer
  • Market Mystique
  • Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link