पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी प्रशांत काजळे.
नवरात्रात दांडीया खेळणाऱ्यां नागरीकांमध्ये दहशत पसरुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपींना अटक भारती विद्यापीठ पोलीसांनी काशल्युपर्ण कामगिरी
दि. ०८/१०/२०२४ रोजी रात्री ०९.०० वा. ते ०९.३० वा. चे दरम्यान अयाच्या स्वामी मंदिरासमोर, जुनी दुग्गड चाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे या ठिकाणी फिर्यादी अर्जन दिलीप मोरे, वय १९ वर्षे, धंदा-शिक्षण, रा. आत्मा मालीक विस्यांत्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, मोहीली अघाई, शहापुर, ठाणे हे त्यांचे मामाचा मुलगा नाम राज अरुण कदम याच्यासह रास दांडीयाचा कार्यक्रम पाहत असताना आरोपी अमीत चोरगे व त्याचे मित्र अक्षय सावंत, अभी सायंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे व त्यांचे सोबतचे इतर तीन ते चार साथीदार यांनी दहशत करण्यासाठी त्यांचे हातातील लोखंडी धारदार हत्यारे हयेत फिरवून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे हातातील लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादी यांचे डोक्यावर, डाचे कानावर व पाठीवर सपासप यार करून गंभीर जखमी केले आहे म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.न ८३०/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम १०९, ३५२, ३५१(२),१८९(२), १८९ (४), १९१(२), १९३(३), १९० आर्म अॅक्ट ४,२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५, किमीनल लॉ अर्मेन्टमेन्ट अॅक्ट ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या.
सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनव चौधरी यांना आरोपी हे कात्रज घाटामध्ये असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज घाटामध्ये सापळा रचून आरोपी १. अमित दिपक चोरघे, यय २७ वर्षे, रा. अटल ११, शेठ प्रतिष्ठानजवळ, सच्चाईमाता, आंबेगाव खु, पुणे मुळ गाव कोळवडी, ता. वेल्हा, जि. पूर्ण २. अजय किसन रांजणे, वय २६ वर्षे, रा. दुगड शाळेचे मागे, शेत प्रतिष्ठान मागे, अटल ११, मदने यांचेकडे भाड्याने, जैन मंदीराजवळ, आंबेगाव खु, पुणे मुळ गाय घायर, ता. वेल्हा जि. पुणे ३. प्रसाद वत्तात्रय रांजणे, वय २२ वर्षे, रा. दुगड शाळेचे मागे, अटल ११, आंबेगाव खु, पुणे मुळ गाय धावर, ता. वेल्हा जि. पुणे ४. अक्षय किसन सावंत, वय २८ वर्षे, रा. अटल नंबर १०, रुम नंबर ४६, शिंद दवाखान्याजवळ, सच्चाईमाता, आंबेगाव खु, पुणे ५. सिध्देश रियाजी सणस, वय २६ वर्षे, रा. जैन मंदीर, अटल १२, संभाजी राजे मित्र मंडळाजवळ, सच्चाइरमाता, आंबेगाव खु, पुणे मुळ गाय करंदी सणस, भोर, जि. पुणे ६. विजय रघुनाथ रांजणे, वय १९ वर्षे, रा. जैन मंदीराजवळ, अटल ११, शेठ प्रतिष्ठानजवळ, सच्चाईमाता, आंबेगाव खु, पुणे यांना ताब्यात घेवून अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सगो, पोलीस मह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नंदीनी वग्याणी सारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनफडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधूत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश मातें, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, नयनाथ भोसले, निलेश ठौरमांडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.