एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बाल रंगभूमी ते सिनेमा अतुल परचुरे यांचा मोठा प्रवास, कॅन्सरशी झुंज अपयशी

अतुल परचुरे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक : संतोष लांडे. कार्यकारी संपादक: किरण सोनवणे.

मराठी सिनेविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अतुल परचुरे यांचे कॅन्सरच्या आजाराने वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी बाल नाटकांतून आपली कारकीर्द सुरु केली होती. अखेर कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली…

बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या अतुल परचुरे यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. परंतू अखेर कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड कठीण गेला होता. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांचा कर्करोग आणखीनच बळावला होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी कर्करोग होण्यापासून ते कर्करोगावर मात करेपर्यंतच्या प्रवासाविषयी भाष्य केलं होते. त्यांच्या कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे.

आपल्या आजाराविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होती की माझ्या लग्नाला २५ वर्ष झाली. मी एकदम फिट होतो आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया-न्युझिलंडला फिरायला गेलो होतो.पण,तिकडून आल्यानंतर काही दिवसांनंतर मला काही खाण्याची इच्छाच होईना. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. काहीतरी गडबड झाली होती. त्यावर माझ्या भावाने मला काही औषधं सुद्धा दिली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मला भिती दिसत होती. मला तेव्हाच कळलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर माझ्या यकृतामध्ये ५ सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर फक्त मी ठीक होणार की नाही हा एकच प्रश्न विचारला. डॉक्टरांनी हो. तू ठीक होशील असं उत्तर दिलं”, असं अतुल परचुरे म्हणाले.

दमदार कमबॅक केले परंतू…
पुढे ते सांगतात, “उपचार सुरु झाले पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. चुकीचा आजार जडल्याने माझी प्रकृती आणखीनच खालावली. सुरुवातीलाच हा आजार न दिसल्यामुळे माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मला नीट चालताही येत नव्हतं. मी बोलत असताना स्तब्ध व्हायचो. या अशा परिस्थिती डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्यांनी सांगितलं जर सर्जरी केली तर वर्षानुवर्ष कावीळ होईल आणि माझ्या यकृतामध्ये पाणी भरेल किंवा मी फार दिवस जगणार नाही. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर दमदार कमबॅक केले होते. ‘खरं खरं सांग’ या नाटकात ते झळकले. इतकंच नाही तर या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी विदेशदौरा देखील केला होता.

अनेक चित्रपट आणि नाटकात काम केले.

अतुल परचुरे यांनी आम्ही सातपुते, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर, कंडीशन्स अप्लाय, कम ऑन यार, तुझ्याविन मर जावान, जिंदगी विराटस ,आधारवड, कलयुग. ऑल द बेस्ट : फन बिगिनर्स आदी नाटक आणि चित्रपटात काम केले होते. तसेच अनेक जाहीरातीत देखील त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सोनिया परचुरे आणि मुलगा सखील परचुरे असा परिवार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link

error: Content is protected !!