आजचे राशिभविष्य, १० ऑक्टोबर २०२४ : महाअष्टमी! जोडीदारासोबत वाद, कामात अडचणी, वाचा गुरुवारचे राशीभविष्य.
आज १० ऑक्टोबर गुरुवार असून नवरात्रीची आठवी माळ आहे. त्यामुळे महागौरीची सर्वांवर कृपा राहिल. आज बुध तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे लक्ष्मीनारायणाचा राजयोग तयार होईल. आठवी माळ असल्यामुळे महागौरीचे पूजन केले जाणार आहे, तसेच महाअष्टमीचे व्रतही पाळले जाईल. आज कन्या, तुळ राशीसह काही राशींवर महागौरीची विशेष कृपा राहिल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. ज्यात यश मिळेल. वरिष्ठांच्या मदतीने समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. गोड बोलून स्वत:ची कामे करावे लागतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य.
मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
सिंह : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शत्रुपिडा नाही.
तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : नवीन परिचय होतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
