पुणे शहर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : प्रशांत काजळे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार
पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष अशोक शिरोळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल व पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण यांची पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भगवानराव गायकवाड, महिपाल वाघमारे, सय्यद हबीब, प्रीतम ढसाळ, अनिलभाऊ अडागळे, विशाल पवार, प्रदीप यादव, सचिन भालेराव, संदीप अवचिते, आदि यावेळी उपस्थित होते.
