सातारा रहिमतपूर पोलिस | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
रहिमतपूर पोलिसांनी नागरिकांचे गहाळ आणि हरवलेले एकूण 18 मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले परत रहिमतपूर पोलिसांचे जनतेतून कौतुक, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. रहिमतपूर पोलीस ठाणेच्या हद्दीमधील नागरिकांचे गहाळ आणि हरवलेल्या मोबाईल बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर सोनाली कदम उपविभागीय पोलिस अधिकारी कोरेगांव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.सचिन कांडगे यांनी रहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीमधील आणि हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता आपल्या पोलीस ठाणेकडील पथक तयार करून हरवलेले मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने रहिमतपूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी.बी केंद्रे पोलीस अंमलदार महेश देशमुख यांनी साईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक माहिती द्वारे महाराष्ट्रातील तसेच पर राज्यांतील मोबाईल मिळालेल्या लोकांशी संपर्क साधून हरवलेल्या मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करून अगदी शिंताफीने परिश्रम घेवुन मोबाईल शोध मोहीम राबविल्याने रहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरवलेले आणि गहाळ झालेले २,६१,००० / रुपये किंमतीचे एकूण 18 मोबाईल हस्तगत करण्यात रहिमतपूर पोलिसांना यश मिळाले आहे, तसेच सन २०२४ मध्येही गहाळ झालेले रक्कम 3,67,000/ किंमतीचे एकूण 25 मोबाईल ही सदर मूळ मालकांना परत करण्यात आले होते, सदरचे मोबाईल स.पो.नि. सचिन कांडगे यांच्याहस्ते तक्रारदारांना व मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सचिन कांडगे पोलीस उपनिरीक्षक जी.बी केंद्रे पोलीस अंमलदार महेश देशमुख सायबर पोलीस ठाणेचे महेश पवार यांच्यासह आदीं पोलिसांनी या मोहिमेत सहभाग घेतला, रहिमतपूर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जनतेतून कौतुक होत आहे.
