एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेरून स्ट्रीट फूड व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवावा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचे नागपूरात आवाहन.

नागपूर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक : संतोष लांडे/ किरण सोनवणे 

नागपूर : प्रधानमंत्री स्वनिधी योजना लाखो परिवारांसाठी जीवनरेखा ठरली असून या योजनेतून त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. या योजनेतून कर्ज घेऊन स्ट्रीट फूड व्यावसायिकांनी आपला स्ट्रीट फूड व्यवसाय वाढवावा

आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन

केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नागपुरात केले . ‘स्वच्छ आहार संकल्प ‘ या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण-एफएसएसआई आयोजित स्ट्रीट फूड व्यावसायिकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आज कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे झाले त्यावेळी ते बोलत होते .

भारताला समृद्ध असा इतिहास आणि खाद्यसंस्कृती लाभली असून चार कोसावर पाणी आणि चार कोसावर वाणी बदलते या उक्तीनुसार जागोजागी खाद्यसंस्कृती मधे बदल होत असतो तरीसुद्धा भारतीय खाद्यपदार्थांची चव ही जगभर प्रसिद्ध असून तिची आपली वेगळी अशी एक ओळख आहे. या खाद्यपदार्थांचा मुख्य आधार हा स्ट्रीट फूड असून या स्ट्रीट फूड व्यवसायाचा अर्थव्यवस्थेला मोठा असा फायदा होत असतो.

स्ट्रीट फूड व्यवसायांचा आता खेड्यांमध्ये सुद्धा प्रवेश झाला असून शेतीबरोबरच उद्योगपूरक व्यवसाय म्हणून त्याची ओळख होत आहे. स्ट्रीट फूड व्यवसायातील खाद्यपदार्थांना आपली वेगळीच अशी एक चव असून तिची स्वतंत्र अशी एक ओळख आहे. मुंबईतील खाऊगल्ली यांचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे जाधव यांनी यावेळी नमुद केले.

स्ट्रीट फूड खाद्यपदार्थांना त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी एफएसएसआय विविध सेवा पुरवत असते यामधे त्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यात विशेष मदत करते यासाठी मानके आणि प्रमाण सुद्धा निश्चित करते. एफएसएसआयच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून स्ट्रीट फूड व्यवसायिकांनी आपली कार्यशैली सुधारावी आणि स्वच्छ पौष्टिक खाद्यपदार्थ जनतेसाठी उपलब्ध राहतील यासाठी प्रयत्नशील असावे असे आवाहन त्यांनी केले .

केंद्र सरकार देशातील दहा मोठ्या शहरात आणि 100 जिल्ह्यात एफएसएसआयए संचलित स्ट्रीट फूड रोड तयार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली .

प्रशिक्षणात नागपूर इथून 2000 तर मुंबईतून 1000 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते .

FSSAI स्वस्थ,स्वादिष्ट,पौष्टिक, किफायतशीर अन्नपदार्थ मिळावे यासाठी प्रतिबद्ध आहे. तसेच FSSAI ने निर्देशित केलेल्या मानकांची नियमांची कायदेशीर पूर्तता केल्यास आपल्याच रोजगारात वाढ होणार आहे. FSSAI चे प्रमाणपत्र आपल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या दर्शनी भागात ठेवल्यास आपल्या खाद्यपदार्थांची विश्वसनीयता वाढणार असून परदेशी पर्यटकांसोबतच स्थानिक जनतेला सुद्धा आपल्या खाद्य पदार्थाबद्दल विश्वासाची हमी मिळेल. त्याचप्रमाणेअसे प्रतिपादन FSSAI चे कार्यकारी संचालक यु. एस. ध्यानी यांनी व्यक्त केले.

प्रशिक्षणा दरम्यान अन्न हाताळणी आणि अन्न सुरक्षा संबंधीचे विविध प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन तज्ञांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थीना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा किट आणि हायजीन किटचा वापर कसा करावा याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली व अन्न पदार्थातील भेसळ घरीच ओळखण्यासाठी डार्ट बुक देण्यात आले.

सोबतच FSSAI ने सुरू केलेला “रुको” (RUCO) अर्थात रीपरपज युज्ड कुकिंग ऑईल जे बायोडिझेल निर्मिती मधे महत्वाची भूमिका पार पाडते या बद्दल माहिती देण्यात आली तसेच सिंगल युज्ड प्लॅस्टिक बद्दल सुद्धा जागरूकता करण्यात आली. .

प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींना अन्न सुरक्षा आणि अन्न हाताळणी तसेच वैयक्तिक आणि ग्राहकांच्या आरोग्य संदर्भात FSSAI चे अधिकृत FOSTAC – फॉस्टॅक प्रमाणपत्र पुरविण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई येथील प्रशिक्षणार्थी सुद्धा दृकश्राव्य प्रणालीने जोडल्या गेले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला स्ट्रीट फूड व्यावसायिक आणि स्ट्रीट फूड संघटना व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link