नागपूर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक: संतोष लांडे/किरण सोनवणे.
नागपूर,दि. 8 : 68 व्या धम्मचक्र प्रर्वतन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने दीक्षाभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायींच्या सुरक्षा व इतर सुविधेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस सहआयुक्त निसार तांबोळी, पोलीस उपायुक्त सर्वश्री डॉ. विजय राठोड, लोहित मतानी, अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, मनपा उपायुक्त मिलींद मेश्राम व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दीक्षाभूमीचा सर्व परिसर प्रत्यक्ष फिरुन आवश्यक त्या सूचना केल्या. दीक्षाभूमी परिसरातील मंडप, मुख्य कार्यक्रम मंडप, सुरक्षा बॅरिकेटस्, स्वच्छतागृह, आरोग्य सेवा, सुरक्षा कॅमेरे, पोलीस विभागातील विविध टिमला नेमून देण्यात येणाऱ्या जबाबदारीची ठिकाणे याबाबत पोलीस सहआयुक्त निसार तांबोळी यांनी जिल्हाधिकारी इटनकर यांच्यासमवेत चर्चा केली. यानंतर त्यांनी अंबाझरी तलाव येथे भेट देवून पाहणी केली.
