एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ऑल इंडिया आर्टिस्ट राईट्स & फिल्म असोसिएशन ची स्थापना

पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक : संतोष लांडे/किरण सोनवणे.

पिंपरी चिंचवड येथे शिवाजी पार्क संभाजी नगर मध्ये हर्षधन विला मध्ये कलाकारांची बैठक पार पडली.

कलाकारांचे अनेक प्रश्न पण कलाकारांसाठी आवाज उचलणार हक्काचं कुणी नाही म्हणून सर्व कलाकारांनी एकत्रीत येऊन या संघटनेची स्थापन केली.

All India Artists Rights & Film Association (ऑल इंडिया आर्टिस्ट्स राईट्स अँड फ़िल्म असोसिएशन) ही नूतन संघटना इथून पुढे कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देईल. सन्माननीय संतोषभाऊ खाडे यांच्या हस्ते नूतन संघटनेच्या छापील पत्रकाचे उदघाटन करण्यात आले.

या मेळाव्यामध्ये कलाकारांच्या हिताचे मुद्दे, महिला कलाकारांच्या सुरक्षिततेचे आणि त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर चर्चा झाली. कलाकारांच्या जीवनातील प्रश्न आणि त्यांच्या जिवनयापन प्रश्न या सारख्या गहन मुद्यावर चर्चा झाली महिला कलाकारांनी बरेच प्रश्न मांडले 

या संघटनेद्वारे कलाकारांचे प्रश्न व त्यावर योग्य मार्गदर्शन तसेच प्रत्येक कलाकाराला काम देण्याचा व कामाचा योग्य मोबदला मिळावा, कलाकारांना सेटवर मानसन्मान मिळावा वेळेत मानधन मिळावे या साठी चर्चा करण्यात आली असून महिला सशक्तीकरनासाठी सेटवर महिलांना स्वतंत्र सुविधा प्रत्येक प्रोडक्शन ने दिल्या पाहिजे कामाचे तास नियोजित असायला पाहिजे तसेच रात्री महिलांना उशीर झाल्यास त्यांची राहण्याची किव्हा त्यांना सोडण्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रोडक्शन ने इथुन पुढे घ्यावी.

तसेच सरकार कडुन कलाकारांना मानधन तसेच जेष्ठ कलावंतांचे थकीत मानधन क्लिअर करावे. सिरीयल चे 3 महिन्याने मिळणार मानधन 30 दिवसात मिळावे.

कलाकारांना कमी व्याजदराने व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देणे. कलाकारांवरती अन्याय होत असेल फसवणूक होत असेल अश्या वेळेस पोलीस प्रशासनाने कलाकारांना सहकार्य करावे.

कलाकार हितासाठी चर्चा करून बऱ्याच विषयांवर चर्चा झाली असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पदाधिकारी नेमणूक करणार असून सर्व कलाकारांना एकत्रित होण्यासाठी आवाहन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात कलाकारांना काम उपलब्ध करून देण्यात येतील असेही या वेळेस संतोषभाऊ खाडे,मंगेश सिरसाट, महेश भट, बलराम पवार यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवर कलाकार

मा.संतोषभाऊ खाडे,महेश भट, मंगेश सिरसाट, बलराम पवार, गजेंद्रकुमार कांबळे, प्रकाश इंगवले, किरण गायकवाड, एकनाथ पाटील, अर्पिता शिवणेकर, सचिन राठोड, अपूर्व बागुल, स्वाती शहा, ज्योती शिंदे मोनिका जाधव

प्राची पवार प्रदीप पवार विक्की वसावे, चंदर वाधवानी, प्रथम कांबळे श्याम देशखैरे मंगेश गांधी तसेच पत्रकार नरेश सोंडकर व रामोजी फिल्म सिटी चे सत्यनारायण जाधव हैद्राबाद वरून उपस्थित होते व इतर कलाकार उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link