नवरात्री | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक संतोष लांडे/ किरण सोनवणे.
नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. यंदा नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून ११ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे.
पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते.नवरात्रीनिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो.
कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !