प्रतिनिधी :गोपाळ भालेराव.
शिंदवणे (पुणे) : आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 रविवार रोजी शिंदवणे येथील संत यादव बाबा माध्यमिक विध्यालय दहवी बँच 2003-2004 हि तब्बल दोन दशका नंतर सगळे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये एकत्र येऊन शाळेचा वर्ग पुन्हा भरविला शाळेच्या नेहमीच्या टाईम प्रमाणे सगळे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहिले नंतर भारत देशाचे सामुहिक राष्ट्रगीत झाले नंतर शाळेचे संस्थापक शिंदवणे गावचे मा सरपंच कै जनार्दन बापु महाडिक यांच्या पुतळा पुजन करुन पुष्पहार अर्पण केलात्यानंतर एक कौतुकास्पद बाब 2003-2004 बँच मधील माजी विद्यार्थी सोनाली संभाजी महाडिक यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते तर सर्व विद्यार्थी शिक्षक वर्गाने श्रध्दांजली वाहिली.
तसेच शाळेमध्ये सोनीलीच्या मुलास एक गणवेश देऊन मुलांचे सांत्वन केले. त्यानंतर शाळेमध्ये नेहमी प्रमाणे वर्ग भरला मुलांची हजेरी झाली नंतर सगळ्या विद्यार्थीने प्रत्येकाची ओळख सांगुन आपला जिवन परिचय सांगितला शिक्षक वर्गाने आपला परिचय करुन मुलांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले. काही विद्यार्थी आपला जीवन परिचय सांगताना भावनिक झाले विषेश म्हणजे भरपूर विद्यार्थी चांगल्या जॅाबला आहेत भरूपुर विद्यार्थी उद्योजक आहेत.तर काही विद्यार्थी दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री व्यवसाय व शेती करत आहेत.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक कांचन सर, विचारे सर, कोपणर सर ,लांडे सर, भोसले मँडम उपस्थित होत्या. मुलांचे सात्वंन करता लांडे सर भावनिक झाले व विद्यार्थी वर्गाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तरी या विद्यार्थी वर्गाचा बोध घेऊन जे कोणी विद्यार्थी अडचणी मध्ये आहे त्याला मदत करण्याचा बोध घ्यावा.नंतर सोनाई व्हेज ऊरुळी कांचन येथे जाऊन सर्व विद्यार्थी वर्ग व शिक्षक वर्गाने एकत्रितपणे जेवण केले. विषेश म्हणजे विद्यार्थी भरपूर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सगळे सूत्र संचालन माजी विद्यार्थीनी निर्मला शेळके कुतवळ व शिंदवणे सोसायटी चे संचालक माजी विद्यार्थी सचिन जालिंदर महाडिक यांनी केले तसेच माजी विद्यार्थीनी श्रुतिका काशिकर ही चांगली गायिका असल्याने एक गणेशोत्सव चालु असल्याने एक सुंदर गीत गायले
कार्यक्रमाचे आयोजन हे माजी विद्यार्थी उद्योजक महेश भुजंग महाडिक, संतोष बाळासाहेब महाडिक, गणेश बाळासो महाडिक, नवनाथ विलास महाडिक, मनोहर श्रीरंग खेडेकर,सचिन सोपान कुंजीर ,रुनिता महाडिक यांनी केले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी सारिका माने,मनिषा म्हस्के वडघुले, दत्तात्रय म्हस्के, स्वाती माने ,छाया महाडिक ,रुपाली महाडिक,राजश्री पवार मेमाणे, कैलास खेडेकर, स्वाती कंजीर खेडेकर, सीमा हंबीर जवळकर , उद्योजक अनिकेत म्हस्के ,अभिजित महाडिक, श्रीकांत खेडेकर, अरुण कामठे ,सागर महाडिक, विशाल म्हस्के , सुरेखा माने शितोळे ,आशा महाडिक शेळके ,मंगल कोतवाल चौधरी, वुषाली महाडिक हरगुडे ,राणी झरड,स्वाती गायकवाड, सारिका कंजीर ,ज्योती म्हस्के काळभोर ,अर्चना म्हस्के, ज्योती झरांडे उपस्थित होते .
विशेष म्हणजे तब्बल दोन दशकांपासून दुर गेलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थीनी या निमित्ताने एकत्र आले.