कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे पुरीगोसावी यांच्याकडूंन स्वागत.
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सातारा जिल्हा पोलीस दलात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातून नव्याने बदलून आलेले आणि कोरेगांव पोलीस ठाण्यांचे विद्यमान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात संभाजी पुरीगोसावी यांनी जयहिंद साहेब असे म्हणत… आपला परिचय देवून स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सोलापूर ग्रामीण मुंद्रुप पंढरपूर शहर अशा विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्णता असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर परिक्षेत्रातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता, सोलापूर ग्रामीण या पोलीस दलातील तेथील कार्यकाल पूर्णता झाल्यामुळे त्यांची नुकतीच सातारा जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार त्यांची कोरेगांव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, प्रशांत हुले एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात,
