वरील नाम फलका वरती गावाचे नाव देण्यास सदर गावातील धार्मिक व ऐतिहासिक अशी संयुक्त सत्यकथा आहे
बौद्ध भिक्षुकांनी गावात विश्रांती म्हणजेच अवसर घेतला होता व छत्रपती श्री शिवाजी महाराज सुरतला जात असताना छावणीचा मुक्काम विश्रांती म्हणजे अवसर सदर गावात घेतल्यामुळे “अवसरी खुर्द “हे नाव पडले
श्री काशी विश्वेश्वराचा अंश श्री काळभैरवनाथ महाराज एका वृद्ध माळी भक्ता बरोबर काशीवरून त्याच्या गावी जाताना अवसरी खुर्द गावी आले व तेथेच निवास केला
तसेच काही माळी मंडळी काशी यात्रेवरून अवसरी गावी येथील ओढ्यावरती स्नान करण्यासाठी थांबले असताना त्यांना श्री काळभैरवनाथाची मूर्ती सापडली व तेथेच मंदिर बांधले
तसेच अवसरी गावच्या एका लिंगायत भक्ताने गावकऱ्यांच्या मदतीने श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी आईची स्थापना करून मंदिर बांधले म्हणून सदर गावास
” श्री काळभैरवनाथ नगरी ” असाही उल्लेख केला जातो.
सदर मंदिराबाबत 1 डिसेंबर 1865 पासून सरकारी दप्तरी नोंद आहे
श्री काळभैरवनाथ यांच्या समोरील मोठे पिंपळाचे झाड पाडून त्या जागी त्रिशूल आहे सदर त्रिशूल श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव यात्रा कार्तिक वद्य
!!८!! अष्टमीला सालाबादप्रमाणे साजरा केला जातो त्या रात्री बारा वाजल्यावर देव जन्म झाला की देवाच्या त्रिशूळ गदगदा हलताना सर्व भाविक भक्तांना दिसतो
हा चमत्कार पिढ्यानपिढ्या , वर्षानुवर्षे , दरवर्षी जन्मदिनाच्या व जन्म वेळेच्या वेळी होतो.
सदर देवस्थान हे नवसाला पावणारे जागृत सनातन पुरातन व कडक देवस्थान आहे . देवाच्या व गावच्या परिसरातील क्षेत्रातील जागेत कोणी दारू ,सिगरेट, मांसाहार, चोरी, व्यभिचार पशुपक्षी मानव गोहत्या व इतर हत्या तसेच असत्य बोलणे वागणे आणि अनितीने अधर्माने अन्याय अत्याचार करणे तसेच काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकाराने दुष्कर्म करणाऱ्याला व भ्रष्टाचार निंदा करणाऱ्याला देव प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवून कडक दंड देऊन शासन करतो व त्यामुळे दैनंदिन जीवनात कौटुंबिक व सामाजिक जीवनात अडचणी दुःख उदभवते कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
असा भाविक भक्तांचा व गावकऱ्यांचा अनुभव आहे म्हणून देवाला “क्षेत्रपाळ ” धर्म रक्षक पण म्हटले जाते .
श्री काळभैरवनाथ नगरी अवसरी खुर्द नामफलक लोकार्पण सोहळा हा प्रति काशी अवसरी खुर्द ( मंचर) तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपद पौर्णिमा प्रतिपदा श्राद्ध रोजी शुभ दिनी ठीक सकाळी 10 वाजता संपन्न झाला व खऱ्या अर्थाने पितृ ना , देवाच्या नाम फलकाने तृप्त व प्रसन्न करण्यात आले कारण प्रत्येकाच्या मुखात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष देवाचे नाव येईल व पूर्वजांना मोक्ष गती वैकुंठ प्राप्त होईल पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा!!- हरिपाठ.
सदर संकल्पना ही बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदी निवडून आलेले वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ व खंदे समर्थक नवनिर्वाचित विद्यमान लोकमान्य लोकनियुक्त तरुण तडफदार ,झुंजार ,कार्यक्षम, कुशल , कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट सरपंच श्री वैभव पोपट वायाळ यांनी बिनविरोध अवसरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड आल्यानंतर पहिल्याच मासिक सभेत सर्वात पहिली मांडली होती .
सदर कार्यक्रमासाठी तालुका पंचायत समितीचे उपसभापती श्री संतोष शेठ यमनाजी भोर पाटील व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी सभापती श्री आनंदराव शिंदे व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री गणेश शेठ सूर्यकांत वायाळ व अवसरी खुर्द गावचे विद्यमान सरपंच श्री वैभव पोपट वायाळ उपसरपंच श्री प्रवीण भोर
रा कॉ पा गावचे अध्यक्ष श्री अमोल बाबाजी वायाळ माजी सरपंच श्री कमलेश शेठ शिंदे माजी सरपंच श्री जगदीश अभंग काळ भैरवनाथ पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष उद्योजक व बिल्डर श्री भरत शेठ भोर
साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्या व गावातील महिला मंडळ सौ उर्मिला तांबे सौ इंदोरे मॅडम सौ सुवर्णा क्षीरसागर सौ विजया भोर सौ स्नेहा टेमकर सौ सुनीता शिंदे सौ प्रतिभा खेडकर सौ कल्पना टेमकर
तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ श्री सचिन ढोणे श्री अनिकेत शिंदे श्री प्रसाद कराळे श्रीहरी शिंदे श्री धनंजय शिंदे श्री मोहन शिंदे माजी उपसरपंच श्री निलेश टेमकर श्री अमित भोर श्री बाळासाहेब वायाळ श्री राजू वायाळ श्री नंदू वायाळ श्री योगेश वायाळ श्री संदेश शेलार व पोलीस पाटील श्री प्रशांत पठारे श्री मुरलीधर कराळे , काळभैरवनाथ वारकरी संप्रदाय धर्मशाळा अध्यक्ष ह भ प श्री धोंडीभाऊ शिंदे महाराज ज्येष्ठ समाजसेवक श्री आनंद भाऊ पाटील हे उपस्थित होते .
लोकार्पण सोहळा अवसरी गावचे कार्यसम्राट विद्यमान सरपंच श्री वैभव पोपट वायाळ यांच्या हस्ते नारळ फोडून व पेढे वाटून उत्साहात व आनंदात साजरा केला गावाला अनेक वर्षानंतर देवाचा व गावचा संयुक्त नावाच्या नामफलक मिळताच सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व अमूल्य असे मानसिक समाधान गावकऱ्यांना प्राप्त झाले परिसरातील भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी सरपंचाचे कौतुक केले
